Ad will apear here
Next
पडवळपाडा केंद्रशाळेला मिळाले आयएसओ मानांकन


ठाणे : शहापूर तालुक्यातील पडवळपाडा या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ही ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची दुसरी व शहापूर तालुक्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘आयएसओ’ मानांकन मिळाल्यानिमित्त पडवळपाडाचे केंद्रप्रमुख एफ. पी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि पुण्यातील समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावात मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘ओटाबू’ (Otabu) या संस्थेने शाळेचे परीक्षण करून (ISO 9001: 2015) मानांकन जाहीर केले. विद्यार्थ्यांचे लेझीम प्रात्यक्षिक तसेच ईशस्तवन व स्वागतगीतांनी केलेल्या स्वागताने मुंबई व पुण्यातील पाहुणे खुश झाले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पडवळ यांनी प्रास्ताविकातून ‘आयएसओ’साठी शाळेचे मुख्याध्यापक जयवंत सांबरे, रेणुका विशे व विजयकुमार देसले यांचे अथक परिश्रम, विविध संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांचे योगदान व त्यातून झालेला शाळेचा विकास उपस्थितांसमोर मांडला; तसेच सध्या शाळेतील सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
 


‘माझगाव डॉक’ व ‘कर्वे’ संस्थेच्या मान्यवरांनी शाळेतील  शिक्षकांचे व ग्रामस्थांचे कौतुक करत भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यादरम्यान दोन्ही संस्था, तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ धाऊदादा पडवळ यांच्याकडून शाळेतील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक विजयकुमार देसले यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेमार्फत ई-लर्निंग सुविधेचा सुयोग्य वापर करणाऱ्या निमनपाडा, अंबरपाडा व चांग्याचापाडा हायस्कूल या शाळांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ‘माझगाव डॉक’चे प्रमुख टी. व्ही. थॉमस, जनरल मॅनेजर डॉ. जे. एम जहांगीर, कार्यक्रम अधिकारी व्ही. पी मेहता, सुरेश कदम, इजाज अहमद, प्रदीप महाडेश्वर, रोहित पंडित, विकास कौशिक, कर्वे समाजसेवी संस्थेचे प्रमुख डॉ. महेश ठाकूर, कार्यक्रम अधिकारी चयन पारधी, रूपेश पवार, खराडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय विशे, ग्रामपंचायत सदस्य विनायक पडवळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वसंत कथोरे व सर्व सदस्य, शिक्षक-पालक व माता पालक संघाचे पदाधिकारी, निवृत्त केंद्रप्रमुख निर्मला पाटील, प्रकल्प समन्वयक स्नेहल नाईक, धनंजय गीते, आरती गीते, क्षेत्र समन्वयक सुहास जाधव, नितीन पाटील, कविता ढोकरे, किशोरी ठकार, पडवळपाडा बीटातील व खराडे केंद्रातील शाळांचे प्रमुख, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विविध बचत गटांच्या महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVWBY
Similar Posts
शहापुरात वसुंधरा संजीवनी मंडळ बांधणार ‘चेक डॅम्स’ ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ब्रम्हलीन योगी ऋद्धीनाथबाबा सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथबाबांच्या ‘पाणी अडवा’ मोहिमेची दखल घेत ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ या सामाजिक संस्थेने सत्संग परिवाराने श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांच्या जागी पक्के चेक डॅम्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे
डॉ. धानके यांचा गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरव ठाणे : पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप धानके यांनी शासकीय सेवेत केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने गुणवंत अधिकारी म्हणून निवड केली होती. म्हसा यात्रेत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या भव्य
शहापूरमध्ये भरणार ‘नाट्यजत्रा’ शहापूर : ग्रामीण भागातील कलेला व्यासपीठ मिळावे या हेतूने स्थापन केलेल्या ग्रामीण कला मंचातर्फे ‘नाट्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १२ एप्रिल २०१९ रोजी प्रकल्पग्रस्त आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या संघर्षाची गोष्ट मांडणाऱ्या वास्तवदर्शी ‘व्हाइट कॉलर’ या दोन अंकी नाटकाचा, तर १३ एप्रिलला समाजातील
राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक शहापूर : तमिळनाडू सिलंबम असोसिएशन व इंडियन सिलंबम फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळनाडूतील इरोड या शहरात टेक्स वॅली चितोड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेत शहापूर तालुक्यातील माधुरी तारमळेने रौप्यपदकाची कमाई केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language